दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले प्रत्यक्ष क्षेत्रीय स्थळी दिलेल्या भेटीतील निर्देशानुसार, निरा उजवा कालव्यावरील जिंती नाका, बारामती पूल, पंढरपूर पूल व राव रामोशी पूल येथील घाटालगत सेवा पथ व निरीक्षण पथाकडील झाडेझुडूपे काढण्यात आलेली आहेत.
गणपती विसर्जनाच्या ठिकाणी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण प्रशासनाने यांनी दिलेल्या भेटीदरम्यान विविध ठिकाणी झाडेझुडपे आढळून आली होती. त्याबाबत फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार कामकाज झाले आहे. आज विसर्जन मिरवणुका आहेत.