दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्याच्या पुन्हा आगमन झालेल्या मान्सूनचा चांगलाच वाढला आहे. पश्चिम बंगाल आणि अरबी समुद्रामध्ये सातत्याने निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर कायम असून पश्चिम महाराष्ट्र आणि घाट माथ्यावर पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासात सर्वाधिक 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून कोयना धरणामध्ये सुद्धा 69 टक्के टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोयना धरणात प्रतिसेकंद 17 हजार 52 क्युसेक पाण्याची आवक होत आहे तर पाणी पातळी एकशे अठ्ठावीस फुटावर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यात पावसाने जिल्ह्यात दोन दिवसापासून प्रचंड थैमान घातले असून वाढलेल्या पावसाच्या जोरामुळे सातारा जिल्ह्यातील बळीराजाची चिंता जरी मिटली असली तरी पुढील शेतीचा हंगाम अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पश्चिम बंगाल आणि अरबी समुद्राच्या पट्ट्यात वारंवार कमी दाबाचे क्षेत्र सातत्याने विकसित होऊन हवामानाच्या पाच किलोमीटरच्या टप्प्यात जलसदृश्य ढगांची निर्मिती होऊन प्रचंड पाऊस पडत आहे त्यामुळे पुढील तीन दिवस पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे गेल्या 24 तासांमध्ये कोयना धरण क्षेत्रात सुमारे 2.3 टीएमसी पाणी साठा वाढला आहे धरणात आता 70 टीएमसी पाणीसाठा झाला आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना नगर, नवजा महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम असून या तिन्ही क्षेत्रातील पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढत होत आहे गेल्या 24 तासात महाबळेश्वर येथे सर्वाधिक 130 कोयनानगर येथे 92 तर नवजा येथे 115 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे दमदार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 17 हजार 52 क्युसेक पाण्याची आवक होत आहे तर पाणी पातळी 2128 फूट झाली आहे.
सातारा शहर आणि तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची हजेरी कायम असून शहर आणि परिसरामध्ये किरकोळ आपत्तीच्या घटना घडत आहेत सातारा शहरात मुसळधार पावसामुळे पोवई नाका तसेच शेंद्रेकडे जाणाऱ्या मुख्य वाहिनीच्या ट्रान्सफरमेशनमध्ये गडबड झाल्याने शहराच्या पश्चिम भागामध्ये सातत्याने विजेचा लपंडाव सुरू होता परळी नागठाणे शेंद्रे त्याचबरोबर डबेवाडी इत्यादी क्षेत्रांमध्ये जोरदार वाऱ्यामुळे कुठे कुठे वृक्ष कोसळल्याची माहिती आहे शाहूपुरी परिसरातही एका ठिकाणी वृक्ष कोसळल्याने वाहतुकीची अडचण निर्माण झाली होती शहरातील रस्त्यांचे पूर्ण खडी उखडून गेल्याने वाहनांसाठी पुन्हा अडथळ्याची शर्यत निर्माण झाली आहे याशिवाय अति नागठाणे रायगाव सायगाव लिंब वीरमाडे तसेच पाचवड इत्यादी ठिकाणच्या सेवा रस्त्यांवर रस्त्यावर पाणी साठवून त्यांना तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
वाई खंडाळा जावली कोरेगाव इत्यादी ठिकाणी सुद्धा पावसाचा जोर कायम असून तेथे नागरिकांची प्रचंड परवड सध्या सुरू आहे महामार्गावर वाहनांना दिशादर्शक करणारे रिफ्लेक्टर चोरीला जात असल्यामुळे वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे वाऱ्याचा जोर आणि महामार्गांवरील पावसाळी कुंद हवा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे जिल्हा यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार धोम धरणामध्ये पाण्याची पातळी 725 मीटर कण्हेर मध्ये पाण्याची पातळी 659 मीटर कोयना धरणामध्ये पाण्याची पातळी 611 मीटर उरमोडी धरणात पाण्याची पातळी 66.5 मीटर इतकी झाली आहे कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे जलाशय परिचलन आराखड्यानुसार धरणातील पाणी पातळी जास्त झाल्यामुळे मंगळवार दिनांक अकरा वाजता धरणातून आवश्यकतेनुसार पाणी सोडले जाणार आहे त्यामुळे वेण्णा नदीच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये सरासरी 23.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे महाबळेश्वर मध्ये 130 ,जावली मध्ये ३०.३, पाटणमध्ये 29.3, साताऱ्यात 24.9 वाई मध्ये 41.3 कराडमध्ये 12.3 कोरेगाव मध्ये 9.9 खटाव वडूज मध्ये 2 मिलिमीटर माण दहिवडी येथे 0.4 मिलिमीटर खंडाळ्यात 21.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे