दैनिक स्थैर्य | दि. 28 ऑगस्ट 2024 | फलटण | राज्यामध्ये मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व विद्यार्थिनींना तब्बल 700 शैक्षणिक कोर्सेस मध्ये शैक्षणिक फी ही पूर्णतः मोफत केली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील हे फलटण दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिली.
यावेळी बोलताना मंत्री ना. पाटील म्हणाले की; भारतीय जनता पार्टीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2017 साली मुख्यमंत्री असताना राज्यांमधील सर्व विद्यार्थ्यांना निम्म्या शैक्षणिक फी मध्ये शिक्षण देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले होते. यासोबतच फडणवीस यांनी राज्यातील सर्व मुलींना आर्ट्स कॉमर्स व सायन्स यांच्यासह जे परंपरागत कोर्सेस आहेत यामध्ये संपूर्ण दिलेली होती.
राज्यामधील ज्या मुलींच्या कुटुंबीयांचे उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे. त्यांना तब्बल 700 कोर्सेस मध्ये पूर्णतः शैक्षणिक फी माफ करण्यात आले आहे. यासोबतच राज्यामध्ये ज्या डिम्ड युनिव्हर्सिटी आहेत; त्यामध्ये ५ लाखापेक्षा कमी उत्पन्नाच्या असणाऱ्या मुलींनाही शिक्षण मोफत देण्यात आले आहे. राज्यामध्ये जी काही स्वायत्त्य विद्यापीठे आहेत; या विद्यापीठांमध्ये मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी १०% जागा राखीव ठेवण्यात येण्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा पारित करण्यात आला असल्याची माहिती मंत्री ना. पाटील यांनी दिली.