दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । लोणंद । लोणंद नगरपंचायत निवडणुकीच्या उर्वरित चार प्रभागांची निवडणूक सर्वसाधारण करण्यात आल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चार जागांसाठी तब्बल ४१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उद्या दिनांक ४ जानेवारी रोजी छाननी केली जाणार आहे तर १० जानेवारी हि अर्ज माघारीची अंतीम तारीख आहे.
प्रभागनिहाय व पक्षनिहाय आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण महिला या प्रभागात वर्षा हणमंत शेळके (राष्ट्रवादी) प्रतिभा राहुल शेळके (काँग्रेस) दिपाली संदिप शेळके (भाजपा) अनिता बब्रुवान माचवे – (शिवसेना) तर अपक्ष म्हणून वर्षा हणमंत शेळके, दिपाली संदिप शेळके, प्रियांका निलेश बुणगे हे तीन असे एकुण सात अर्ज आलेले आहेत. प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण महिला या प्रभागासाठी निर्मला दादासाहेब शेळके – राष्ट्रवादी, स्वाती दादासाहेब शेळके – राष्ट्रवादी, मनिषा चंद्रकांत शेळके- राष्ट्रवादी, आसिया साजिद बागवान – काँग्रेस, संगीता किशोर बुटीयानी – भाजपा, राधिका संजय जाधव – शिवसेना तर अपक्ष म्हणून स्वाती दादासाहेब शेळके, मनिषा चंद्रकांत शेळके, संगीता किशोर बुटीयानी असे एकुण नऊ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक अकरा या सर्वसाधारण प्रभागातून भरत जयवंत बोडरे – राष्ट्रवादी, अमित आप्पासो भंडलकर – राष्ट्रवादी, उत्तम शामराव कुचेकर – काँग्रेस,श्रीकुमार सुरेश जावळे – भाजपा, विश्वास सदाशिव शिरतोडे – शिवसेना, नितीन विश्वास शिरतोडे – शिवसेना तर अपक्ष म्हणून अमित आप्पासो भंडलकर, शरद वसंतराव भंडलकर, विश्वास सदाशिव शिरतोडे असे एकुण दहा अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत तर प्रभाग क्रमांक सोळा या सर्वसाधारण प्रभागातून सर्वाधिक १५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत ते पुढील प्रमाणे. विनया दत्तात्रय कचरे – राष्ट्रवादी, दत्तात्रय ज्ञानोबा कचरे – राष्ट्रवादी, जावीद शमशुद्धीन पटेल – राष्ट्रवादी, प्रविण बबनराव व्हावळ – काँग्रेस, मेघा प्रवीण व्हावळ – काँग्रेस, प्रविण बबनराव व्हावळ-काँग्रेस, मेघा प्रवीण व्हावळ – काँग्रेस, प्रदीप नामदेव क्षीरसागर – भाजपा, गणेश शंकर पवार – सेना, सुनिल विठ्ठल यादव – सेना तर अपक्ष म्हणून विनया दत्तात्रय कचरे, दत्तात्रय ज्ञानोबा कचरे, मेघा प्रवीण व्हावळ, जावीद शमशुद्धीन पटेल, प्रदीप नामदेव क्षीरसागर असे अर्ज दाखल करण्यात आलेत.