
स्थैर्य, सातारा, दि. 27 : डॉ. अनिल पाटील यांची राज्यस्तरीय शैक्षणिक सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षण प्रणालीसाठी जी धडपड चेअरमन साहेब करत आहेत, त्याचेच हे फलित आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री अध्यक्ष असलेल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे शैक्षणिक धोरण ठरविणाऱ्या राज्यस्तरीय शैक्षणिक सल्लागार समितीच्या, आठ सदस्याच्या समितीत त्यांची निवड होणे, हा रयत शिक्षण संस्थेचा बहुमान आहे.