दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑगस्ट २०२३ | फलटण | राजाळे ता. फलटण येथील जवान वैभव भोईटे हे आपले सेवा बजावत असताना शहीद झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर राजाळे या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. देशाची सेवा बजावत असताना आपल्या तालुक्यातील जवान शहिद झाल्याने भोईटे यांच्या मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी हि विधानपरिषदेचे माजी माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतली आहे. याबाबतचे पत्र शहीद जवान वैभव भोईटे यांच्या पत्नी श्रीमती प्रणाली वैभव भोईटे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि; राजाळे, ता. फलटण येथील जवान हे आपली सेवा बजावताना लडाख येथे झालेल्या अपघातात शहीद झाले आहेत. यामुळे भोईटे कुटुंबाची फार मोठी हानी झाली आहे. देशासाठी सेवा बजावत असताना शहीद झाल्यामुळे आगामी काळामध्ये त्यांची मुलगी कु. हिंदवी हिच्या भविष्यातील शिक्षणाची संपूर्ण खर्च हा फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तरी कु. हिंदवीच्या शिक्षणासाठी लागणार सर्व खर्च हा फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन विधानपरिषदेचे माजी माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहे.