दैनिक स्थैर्य । दि.१५ एप्रिल २०२२ । बारामती । ग्रामीण भागातही आर्यनमॅन ची क्रेझ वाढत आहे डॉ गावडे यांच्या सारख्या वैदकीय क्षेत्रातील जिगरबाज डॉक्टर व खेळाडू मुळे बारामती च्या क्रीडा वैभवात भर पडत आहे असे प्रतिपादन बारामती चे प्रांतधिकारी दादासो कांबळे यांनी केले.
बुधवार १३ एप्रिल रोजी कुबेर मित्र परिवार बारामती च्या वतीने डॉ पांडुरंग गावडे यांनी साऊथ आफ्रिकेत आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करून आर्यनमॅन पुरस्कार पटकाविला बदल डॉ गावडे यांचा सपत्नीक सत्कार समारंभ चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी दादासो कांबळे बोलत होते. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय अधीक्षक हनुमंत पाटील,नगरपरिषद चे मुख्यधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक डॉ अजिनाथ खरात व डॉ उजवला गावडे आदी मान्यवर व कुबेर ग्रुप बारामती चे सदस्य व कुटूंबीय उपस्तीत होते.
वैदकीय व्यवसाय सांभाळत, वयाच्या चाळीशी नंतर पहाटे 4 वाजल्या पासून दररोज 5 ते 6 तास सराव करून जगातील अनेक स्पर्धकाशी स्पर्धा करीत अवघ्या 12 तासात आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करून ‘किताब’ मिळवणे हे उल्लेखनीय आहे यांचा आदर्श विद्यार्थी, तरुण पिढीने घ्यावे असेही दादासो कांबळे यांनी सांगितले.
सर्व सामान्य बेताची परिस्थिती असताना वैद्यकीय क्षेत्रात डॉ होण्याचे स्वप्न पूर्ण केले त्यानंतर स्वतः चे हॉस्पिटल निर्माण केले व आता आर्यनमॅन होऊन सुद्धा यशाची हवा डोक्यात न जाऊन देता या पुढे इतर जागतिक स्पर्धा पूर्ण करण्यासाठी प्रत्यनशील असणारे डॉ गावडे आदर्शवत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले. जिद्द चिकाटी व आत्मविश्वास च्या बळावर आर्यनमॅन स्पर्धा जिंकलेले डॉ गावडे बारामती चे वैभव असल्याचे हनुमंत पाटील यांनी सांगितले
जास्तीजास्त सराव व योग्य आहार करून डॉ गावडे यांनी यश मिळवले हे कौतुकास्पद असल्याचे डॉ अजिनाथ खरात यांनी सांगितले
” पोहण्यास येत नसताना सुद्धा प्रथम पोहणे शिकलो,ऍलर्जी असताना सुद्धा त्यावर मात केली त्यानंतर फक्त तीन महिन्यात साइलिंग,धावणे,व पोहणे या मध्ये भरपूर सराव व सर्वांच्या शुभेच्छा मुळे आर्यनमॅन झालो ध्येय निश्चित करा व प्रत्यन करा तरच यश मिळेल असे सत्काराला उत्तर देताना डॉ पांडुरंग गावडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन करून आभार अनिल सावळेपाटील यांनी मानले