आर्य अष्टांग मार्ग म्हणजे बुद्ध विचारांचे सार – प्राचार्य विजय मोहिते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२३ । मुंबई ।

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याकाळात म्हणाले होते की आर्य अष्टांग मार्गाने मला जावेच लागेल म्हणजेच चार आर्य सत्य होय ते म्हणजे अनुक्रमे दुःख, दुःखाचे कारण, दुःख नष्ट होऊ शकते, दुःख नष्ट करण्याचा मार्ग म्हणजेच दुःख निरोधगामिनी पट्टीपदा या चौथ्या आर्य सत्यामध्ये आठ सत्य मोडले जातात व सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक ही तीन पिटिका येतात या विषयावर बोलत असताना प्राचार्य विजय मोहीते यांनी प्रत्येक सत्यावर विवेचन करून उदाहरणासहित सविस्तरपणे पटवून दिले, पाली ही मूळ भारतीय मातृभाषा असून ती देशाची बोलीभाषा होती, जी बोलण्यासाठी सहज, सुलभ होती त्यामुळेच आपल्याला कल्पना ही करता येणार नाही इतके पालीभाषेचे शब्द मराठीत आलेले आहेत म्हणून पाली आणि मराठी या दोन्ही अनुषंगाने विषय हाताळताना प्रत्येक सत्याचा अर्थ आणि उद्घोष करत आर्य अष्टांग मार्ग म्हणजे बुध विचारांचे सार आहे असे प्रमुख वक्ता यानात्याने बौध्दजन पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास मालिकेचे दुसरे पुष्प गुंफताना वरीलप्रमाणे प्रतिपादन करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकांचे आयोजन सरसेनानी इंदुमिलचे प्रणेते आणि समितीचे सभापती मा. आनंदराज आंबेडकर यांच्या अध्क्षतेखालील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई -१२ येथे आयोजित करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समिती सचिव मनोहर बा. मोरे, प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार यांनी केले, दुसरे पुष्पाचे प्रमुख वक्ते प्राचार्य विजय मोहिते आपल्या प्रवचनात पुढे म्हणाले की “अफगाणिस्तान अनेक गुंफा सापडल्या त्यात अनेक बौद्ध ग्रंथ, साहित्य उत्खननात आज पुन्हा प्रकाशात येत आहेत त्यामुळे बहुजन समूहातील अनेक लोक बौद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत, प्राचीन बौद्ध धम्मावर इतर अर्वाचीन धर्मांनी केलेल्या हल्लात बौद्ध साहित्य लोप पावू नयेत म्हणून तत्कालीन भंतेजीनी अनेक गुंफात बौद्ध साहित्य जतन करण्यासाठी लपवून ठेवली होती, भारतात ही कित्येक अश्या गुंफा आहेत ज्याचे सरकारने उत्खनन केले तर अनेक बौद्ध साहित्य पुन्हा उजागर होतील अशी माझी खात्री आहे, म्हणून सर्व उपासक, उपसिकांनी तीन महिने नुसते प्रवचन मालिका न ऐकता त्यानंतर नऊ महिने धम्मप्रचार, प्रसार करून खेडोपाडी शेवटच्या व्यक्तीपर्यंत, इतर ओबीसी बांधवांपर्यंत धम्म पोहोचवला पाहिजे असे  प्रतिपादन करून आपले विचार व्यक्त केले, त्याचबरोबर अध्यक्षीय भाषणात आनंदराज आंबेडकरांनी आर्य अष्टांग मार्ग या विषयावर आपले विचार व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच सदर प्रवचन मालिकेच्या माध्यमातून अनेक संकल्प आहेत जे सदर मालिकेच्या माध्यमातून मांडून त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर बौध्दजन पंचायत समितीचे उपसभापती मा. विनोदजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत, माजी कार्याध्यक्ष व पतपेढीचे अध्यक्ष किशोरजी मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच. आर. पवार, मनोहर सखाराम मोरे, चिटणीस श्रीधर साळवी, रवींद्र पवार, संदेश खैरे, रवींद्र शिंदे, राजाभाऊ गमरे, प्रमोद सावंत तसेच व्यवस्थापक मंडळाचे सर्व कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी, उपसमित्यांचे सर्व कार्यकर्ते, शाखांचे कार्यकर्ते शुभ्र वस्त्र परिधान करून सभागृहात उपस्थित होते,त्यामुळे सभागृह गच्च भरला होता, भगवान साळवी, सुभाष साळवी, किशोर साळवी या साळवी बंधूंनी आपली मातोश्री वनिता परशुराम साळवी यांच्या स्मरणार्थ खीरदान केले.

सदर कार्यक्रमास सम्यक कोकण कला संस्था महाराष्ट्र (रजि) चे कार्यकर्ते, कलाकार व सभासद बहुसंख्येने उपस्थित राहिले होते त्यांनी आंबेडकरी चळवळ खेड्यापाड्यात पोहोचवण्याचे महत्कार्य कलावंतांनी केलं म्हणून नवोदित येणाऱ्या कलावंतांना घडविण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या होणाऱ्या स्मारकात एखादे दालन असावे अश्या मागणीचे सूचना वजा निवेदन शिष्टमंडळाने आनंदराज आंबेडकरांना सुपूर्द केले, अनेक उपक्रम बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली राबविले जातात त्यांचे उपक्रम, संकल्प आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अश्या प्रकारचे प्रतिपादन करून सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!