दैनिक स्थैर्य | दि. १६ डिसेंबर २०२४ | बारामती |
बारामती तालुका असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी अँड प्रॅक्टिशनर संघटनेची २०२४-२०२५ ची कार्यकारिणीची मीटिंग १३ डिसेंबर रोजी संपन्न झाली. संघटनेच्या अध्यक्षपदी अरविंद जरांडे, उपाध्यक्षपदी प्रमोद जाधव व प्रशांत हेंद्रे यांची एकमताने निवड करण्यात आली.
संघटनेच्या इतर निवडीमध्ये महिला उपाध्यक्षपदी सौ. प्रिया महाजन, सौ. मिनाक्षी देवकाते, सचिवपदी योगेश निंबाळकर, सहसचिव सौ. मनीषा जगताप, खजिनदार सोमनाथ वायसे, सहखजिनदर रोहित ढाले, महिला प्रतिनिधी सौ. गीता व्होरा, सौ. अर्चना वाघ, सौ. दिपीका काटे, सौ. अनिता लोणकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र रणमोडे, कार्यकारिणी सदस्य शहाजी खराडे, सौ. वंदना नाझिरकर आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांचे, आरोग्य आदीबाबत जनजागृती करत असताना वैद्यकीय प्रयोगशाळा व तंत्रज्ञानाबाबत समस्या सोडवण्यासाठी वेगाने काम करू आणि समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रत्यन करू, असे निवडीनंतर अध्यक्ष अरविंद जरांडे यांनी सांगितले.