प्रभाग १२ मध्ये अरुण खरातांचा प्रचार जोमात


स्थैर्य, फलटण, दि. २३ नोव्हेंबर : प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपचे अरुण खरात अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रचारात उतरले आहेत. सकाळी लवकर घराबाहेर पडणारे आणि रात्री दिवे विझेपर्यंत गल्लीबोळात फिरणारे असे त्यांचे रोजचे रणशिंग वाजले आहे. प्रत्येक गल्लीत, चौकात आणि दारापाशी त्यांची गाठ पडताच नागरिक आस्थेने विचारपूस करत आहेत. प्रभागात चांगलाच सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळताना दिसतोय.

अरे कोरोनाच्या काळात गावभर औषधं, सॅनिटायझर, अडचणीतल्या कुटुंबांना राशन—जेव्हा हव होती, तेव्हा खरात सर धावत आले अशी लोकांची आठवण आजही ताजी आहे. स्वच्छतेच्या मोहिमा, आरोग्य शिबिरे, वस्तीवस्तीतील लहानमोठ्या समस्यांवर पाठपुरावा—या सगळ्या कामांची चर्चा प्रभागात व्हायला लागली आहे.

पर्यावरणासाठी वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना वह्या–पुस्तकं, फी मदत… ही कामं तर नागरिकच सांगत आहेत. निवडूंन आलो तर अजून दुपटीने सुविधा वाढवू, अपूर्ण कामं पूर्ण करू, असं अरुण खरात मतदारांना ठामपणे सांगत आहेत.

एकूणच, प्रभाग १२ मध्ये अरुण खरातांचा प्रचार जोर धरलाय. कामाचा हिशेब, भावनेची नाळ, नागरिकांचा प्रतिसाद या तिहेरी जोरावर त्यांची लाट तयार होताना दिसते. आता हे जनसंपर्काचं वादळ मतदानात किती उतरते, हे पाहणं खरोखरच रंजक ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!