
दैनिक स्थैर्य | दि. 24 मे 2025 | फलटण | युवा नेते प्रा. अरुण खरात यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा नेते अमोल सस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह म्हणाले की, प्रा. अरुण खरात यांच्यासारख्या तळागाळातील काम करणाऱ्या कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद नक्कीच वाढली आहे. यापुढे त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहे.
माजी नगरसेविका सौ. ज्योती खरात यांचे अरुण खरात हे पती आहे.