दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । भारतामध्ये रोबोटिक्स विभाग विकसित करणारी परिसंस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत ना-नफा तत्त्वावर असलेली संस्था आर्टपार्क (एआय अँड रोबोटिक्स टेक्नोलॉजी पार्क)ने रोबोटिक्स चॅलेंज सादर केले आहे. आर्टपार्क रोबोटिक चॅलेंज आर्टपार्कच्या रोबोटिक परिसंस्थेला पाठिंबा, संवर्धन व निर्माण करण्याप्रती आणि भारताला रोबोटिक्स निर्माण व तंत्रज्ञानांमध्ये जागतिक अग्रणी बनवण्याप्रती असलेल्या मिशनशी पूर्णत: संलग्न आहे.
या रोबोटिक चॅलेंज अंतर्गत आर्टपार्कने पुढील टप्प्यासाठी २७ टीम्सची निवड केली आहे आणि चार टीम्स: सीर्बरस, ग्रायफाइण्डर्स, गिगा रोबोटिक्स आणि रोबो ज्योथियन्स अंतिक फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या चॅलेंजमध्ये रोबोट्सनी विशेषत: वॉशरूममध्ये करता येतील अशी जेनिटोरियल कामांचे प्रात्यक्षिक दाखवणे आवश्यक आहे. या चॅलेंजमध्ये असलेली कामे जमिनीवर असू शकणारा कोणताही कचरा साफ करण्यासोबत सॅनिटायझिंग लिक्विडचा वापर करत वॉशबेसिन व वॉशबेसिन काऊंटरची साफसफाई करण्याबाबत आहेत.
मुख्य टेक्निकल आव्हाने आहेत योग्य सेन्सर्सचा वापर करून वॉशरूम व आसपासच्या जागेचे अचूक मॅप तयार करणे (स्वत:हून), नेव्हिगेशन, पिकअप, मॉपिंग कामांसाठी रोबोटिक व्यासपीठ व मॅनिप्युलेटर डिझाइन करणे, अचूकपणे ओळखण्यासाठी पर्सीप्शन अल्गोरिदम्स तयार करणे, वॉशरूमधील विविध वस्तूंची जागा व आकारांचा अंदाज घेणे. रोबोला वॉशरूमची संपूर्ण पाहणी करण्याची संधी देण्यात येईल, ज्यामुळे तो परिस्थितीचे मूल्यांकन करू शकेल आणि नियोजन व नेव्हिगेशन हेतूंसाठी प्रक्रिया निर्धारित करू शकतो.
भविष्यात आर्टपार्कचा हेल्थकेअर, शिक्षण, मोबिलिटी, पायाभूत सुविधा, कृषी, रिटेल व सायबर-सिक्युरिटीमध्ये सामाजिक प्रभाव निर्माण करण्याचा आणि भारत व विकसित होत असलेल्या जगाशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा मनसुबा आहे.