आर्टपार्कद्वारे एआय व रोबोटिक्स नवोन्मेष्कारांचे प्रदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । आयआयएससी, बेंगळुरू येथील भारतातील पहिले एआय अॅण्ड रोबोटिक्स टेक्नोलॉजी पार्क (आर्टपार्क)ने नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या बेंगळुरू टेक समिट (बीटीएस) २०२२ मध्ये सहभाग घेतला आणि मोठी झेप घेणाऱ्या एआय व रोबोटिक्स नवोन्मेष्कारांना दाखवले. बेंगळुरू टेक समिट हे आशियातील सर्वात लोकप्रिय तंत्रज्ञान समिट आहे आणि यंदा या उपक्रमाचे २५वे वर्ष आहे.

स्टार्टअप@आर्टपार्क उपक्रमांतर्गत पाच प्री-व्हेंचर्सनी चतुर्भुज रोबोट्स, ड्रोन्स सोल्यूशन्स, टेलि‍प्रेझेन्स टेक्नॉलॉजीज, स्वदेशी रोबोटिक घटक आणि एआय-मार्गदर्शित योगा-संचालित वेलनेस सोल्यूशन्स विकसित करण्यामधील त्यांच्या कामगिरीला दाखवले. स्टार्टअप@आर्टपार्कचा आरोग्यसेवा, गतीशीलता व शिक्षणामधील मोठी झेप घेणाऱ्या एआय व रोबोटिक्स नवोन्मेष्कारांसह २०३० पर्यंत १ बिलियन व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या आर्टपार्कच्या मोठ्या दृष्टिकोनाशी संलग्‍न उद्दिष्टे असलेल्या स्टार्टअप्सना साह्य करण्याचा मनसुबा आहे. आर्टपार्क एआय व रोबोटिक्समधील अत्याधुनिक स्टार्टअप्सना को-फंड करण्यासाठी १०० दशलक्ष डॉलर्स आर्ट व्हेंचर फंड (एव्‍हीएफ), सेबी नोंदणीकृत कॅटेगरी २, एआयएफच्या निर्मितीला देखील पाठिंबा देत आहे.

आर्टपार्कचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी उमाकांत सोनी म्हणाले, “एआय व रोबोटिक्समधील पुढील गेम-चेंजिंग स्टार्टअप भारतातील ८५० दशलक्ष भारतीय राहत असलेल्या अद्वितीय बाजारपेठांसोबत अत्याधुनिक संशोधन व नाविन्यतेच्या एकसंधी मिश्रणासह येतील. आर्टपार्कमध्ये आम्ही वास्तविक विश्वातील आव्हानांचे निराकरण करण्यासाठी शाश्वतपूर्ण नवोन्मेष्कारी कंपन्यांसह मोठ्या प्रमाणात प्रभाव निर्माण करत आहोत. बीटीएस २०२२ ने आम्हाला आमचे दर्जात्मक तंत्रज्ञान सोल्यूशन्स दाखवण्यासाठी, उद्योगातील दिग्गजांकडून अभिप्राय मिळवण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सहयोग करत नवीन व्यवसाय संधींचा शोध घेण्यासाठी लाँचपॅड म्हणून सेवा दिली. आम्ही भारताच्या आत्मनिर्भर अभियानाला चालना देण्याच्या उद्देशाने मोठा प्रभाव घडवून आणण्यासाठी नाविन्यपूर्ण परिवर्तन करत राहू.’’

याव्यतिरिक्त आर्टपार्कने तीन प्रमुख विषयांवर विचारशील पॅनेल चर्चासत्रांचे आयोजन देखील केले. पहिल्या चर्चासत्रामध्ये डॉ. भारद्वाज अमृतूर (आर्टपार्क/आयआयएससीचे संशोधन प्रमुख) यांनी ‘विकसित जगासाठी रोबोटिक्स इकोसिस्टिम निर्माण करणे: आव्हाने व संधी’ या विषयावर चर्चा केली. दुसऱ्या चर्चासत्रामध्ये उमाकांत सोनी (आर्टपार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी भारतातील वाढत्या एआय स्टार्टअप्सबाबत चर्चा केली, ज्यामधील क्षमता आता बिलियनहून अधिक वापरकर्त्यांपर्यंत वाढत आहे. तिसऱ्या चर्चासत्रामध्ये रघु धर्माराजू (आर्टपार्कच्या प्रॉडक्ट्सचे अध्यक्ष) यांनी ‘व्यक्तीचे आरोग्य व महामारीसाठी सुसज्जता’ या विषयावर चर्चा केली.


Back to top button
Don`t copy text!