४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
दैनिक स्थैर्य | दि. ०४ जानेवारी २०२५ | फलटण | श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण द्वारे आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ च्या चर्चासत्रादरम्यान, कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे विषय विशेषज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा एक उत्तम पर्याय असल्याचे मार्गदर्शन केले.
चर्चासत्रासाठी अध्यक्षस्थानी फलटण एज्यकेशन सोसायटीचे गव्हर्निंग समितीचे सदस्य आर. एच. पवार हे उपस्थित होते. डॉ. विवेक भोईटे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्तेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधुनिक शेतीसाठी उपयोग, पाण्याची व खताची बचत, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे ऊस पिक घेताना फर्टिगेशन तंत्रज्ञान, नवीन कीटकनाशकांची व खतांची माहिती या विषयांवर मार्गदर्शन केले.
कृषि विभागाचे कृषि सहायक कुलदीप नेवसे यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विविध कृषी योजना आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आर. एच. पवार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना उपस्थित शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तसेच आयोजित विविध कृषी विषयक चर्चा सत्रांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या चर्चासत्रासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि शेतकरी वर्ग उपस्थित राहिले. कुमारी सृष्टी झाहडावकर या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
आधुनिक शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा एक महत्त्वाचा पर्याय असल्याचे डॉ. विवेक भोईटे यांनी स्पष्ट केले. या तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना पिकांच्या रोगांशी लढणे, पाण्याची व खताची बचत करणे आणि उत्पादन इष्टतम करणे सोपे होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.