दैनिक स्थैर्य । दि. ०५ मार्च २०२२ । सातारा । ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या ‘तालुकास्तरीय माहिती संकलन मोहीमेचा भाग म्हणून मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने एक आगळी लेख व लघुमाहितीपट स्पर्धा जाहीर करत आहोत. या स्पर्धेचे विषय अचलपूर, फलटण, दापोली, बदनापूर व शेवगाव या पाच तालुक्यांतील असणार आहेत.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. तुमचे गाव, गावातील वैशिष्ट्यपूर्ण असे देवस्थान – उत्सव – परंपरा – जत्रा – लक्षणीय कार्य करणारी व्यक्ती वा संस्था अशा कोणत्याही सकारात्मक विषयावर ५०० ते १००० शब्दांत लेख लिहून किंवा ३ ते ५ मिनिटे कालावधीचा लघुमाहितीपट (शॉर्ट डॉक्युमेंट्री) तयार करून पाठवणे अपेक्षित आहे.
लेख स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील पहिल्या क्रमांकाच्या लेखास ३०००/- रुपये दुसऱ्या क्रमांकाच्या लेखास २०००/- रुपये व तिसऱ्या क्रमांकाच्या लेखास १०००/- रुपये बक्षीस असणार आहे. तसेच, लघुमाहितीपट स्पर्धेतील प्रत्येक तालुक्यातील पहिल्या क्रमांकाच्या माहितीपटास ५०००/- रुपये दुसऱ्या क्रमांकाच्या माहितीपटास ३०००/- रुपये व तिसऱ्या क्रमांकाच्या माहितीपटास २०००/- रुपये बक्षीस असणार आहे.
याशिवाय स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकास विशेष पारितोषिक मिळू शकणार आहे. संपादकांनी सुचवल्याप्रमाणे सुधारणा करून व वाढीव तपशिलांसह लेख वा लघुमाहितीपट पाठवल्यास संपादकांच्या सुचनेनुसार तो लेख/लघुमाहितीपट ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या पोर्टलवर स्पर्धकाच्या छायाचित्र-परिचयासह प्रसिद्ध करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क – महेश खरे ९३२०३०४०५९, नितेश शिंदे ९८९२६११७६७
इमेल – [email protected]
वेबसाईट – www.thinkmaharashtra.com