दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२२ । सातारा । सातारा शहरात कलाकाराच्यासाठी होत असलेला कलाकारी महोत्सव, कलाकार म्हणून मनाला खूप आनंद देणारा असून. यातूनच मोठ्या प्रमाणात कलासंस्कृती निर्माण होईल असे प्रतिपादन सातार्याचे सुपुत्र व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रमोद कुर्लेकर यांनी व्यक्त केले. ते भारती फाउंडेशन प्रस्तुत कलाकारी-2 च्या, उदघाटन समारंभात बोलत होते. यावेळी प्रसिध्द चित्रकार अमित ढाणे, ज्येष्ठ चित्रकार बाबा पवार, भारती फाउंडेशनचे रविंद्र भारती- झुटिंग, शिल्पकार महेश लोहार प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमित ढाणे म्हणाले, लहानपणी मुलांच्यावर कलेचे संस्कार होणे महत्वाचे असते. यातूनच मोठे कलाकार निर्माण होवू शकतात आणि हा प्रयत्न कलाकारी महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. ही समाधानाची बाब आहे.
कलाकारीच्या माध्यमातून सातारा जिल्हातील विशेष करुन ग्रामीण भागातील कलाकाराच्यासाठी हक्काचे व्यासपिठ निर्माण करुन देणे. लहान मुलांना कलेकडे आकर्षित करणे हा कलाकारी महोत्सवाचा मुख्य उद्देश असून हा महोत्सव दर वर्षी डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संकल्पक रविंद्र भारती-झुटिंग यांनी दिली.
कलाकारी-2 मध्ये सुरज कुंभार, आशिष कुंभार, मंदार लोहार यांनी शिल्पकला. गणेश कोकरे, सांगलीच्या कु. संयुक्ता कुदळे यांनी पोर्ट्रेट पेंटिंग. सम्राट कांबळे यांनी पेन्सील पोर्ट्रेट. सागर जाधव यांनी मधुबनी पेंटिंग. पाचगणीचे प्रमोद शिंदे यांनी रांगोळी. पुण्याच्या मुक्ता चव्हाण यांनी पॉटरी. सिध्दांत पिसाळ यांनी रचना चित्र. माधुरी पाटणकर, वाईच्या बाळासाहेब कोलार यांनी लँन्डस्केप पेंटिंग. कु. पियुषा भोसले हिने गायन. तेजश्री मेस्त्री-सुतार यांनी ओरीगामी. कु. मानसी सदामते हिने कथक. मुंबईच्या अनिल गोवळकर यांनी कॅलिग्राफी. कु. स्वरा किरपेकर हिने हार्मोनियम, चि. प्रणव पित्रे यांने तबला तर चैता स्वाती, आर्यन उत्तेकर, अनुजा बोकील, विजय साळुंखे यांनी गिटारचे सादरी करण केले. याला कलारसिकांचा, नागरीकांचा व विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.
यावेळी कराडाचे ज्येष्ठ कलाकार बाबा पवार यांना कलागौरव पुरस्कार मान्यवराच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. वैदही कुलकर्णी, संपदा देशपांडे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष काठाळे, शकील शेख, सिध्दार्थ लाटकर, यशवंत घोरपडे, दत्ता चाळके, संजय झेपले, शशीभूषण जाधव, केदार खैर, शुभम तंटक, मिथाली लोहार, शिवानी भारती, गौरव इमडे परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठया संख्येने कलाक्षेत्रातील मान्यवर, कलाशिक्षक, कलाकार, कलाप्रेमी, नागरीक उपस्थित होते.