
दैनिक स्थैर्य । 25 जुलै 2025 । फलटण । येथील बाजार समितीत विविध धान्यांची आवक झाली असून येथील घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे.
बाजार समितीत ज्वारीची 125 क्विंटल ज्वारीची आवक झाली. ज्वारीला किमान 2 हजार 200 रुपये क्विंटल तर, कमाल 3 हजार 500 रुपये क्विंटल दर मिळाला. बाजरीची 286 क्विंटल आवक झाली. बाजरीला किमान 2 हजार 200 रुपये क्विंटल तर कमाल 2 हजार 286 रुपये क्विंटल दर मिळाला. गव्हाची 383 क्विंटल आवक झाली. गव्हाला किमान 2 हजार 500 हजार रुपये क्विंटल तर किमान 2 हजार 825 रुपये क्विंटल दर मिळाला. हरभर्याची 45 क्विंटल 4 आवक झाली. हरभर्याला किमान 4 हजार 500 रुपये तर कमाल 6 हजार 100 रुपये क्विंटल दर मिळाला. मक्याची 109 क्विंटल आवक झाली. मकेला किमान 2 हजार 100 रुपये क्विंटल तर कमाल 2 हजार 350 रुपये क्विंटल दर मिळाला. घेवड्याची 30 क्विंटल आवक झाली. घेवड्याला किमान 5 हजार रुपये क्विंटल तर कमाल 6 हजार 700 रुपये क्विंटल दर मिळाला. मुगाची 3 क्विंटल आवक झाली. मुगाला किमान 6 हजार रुपये क्विंटल तर कमाल 6 हजार 500 रुपये दर मिळाला.