बाजार समितीत विविध धान्यांची आवक


दैनिक स्थैर्य । 10 जुलै 2025 । फलटण । येथील बाजार समितीत विविध धान्यांची आवक झाली असून येथील घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे.

बाजार समितीत ज्वारीची 182 क्विंटल ज्वारीची आवक झाली. ज्वारीला किमान 2 हजार 300 रुपये क्विंटल तर, कमाल 3 हजार 400 रुपये क्विंटल दर मिळाला. बाजरीची 367 क्विंटल आवक झाली. बाजरीला किमान 2 हजार रुपये क्विंटल तर कमाल 3 हजार रुपये क्विंटल दर मिळाला. गव्हाची 580 क्विंटल आवक झाली. गव्हाला किमान 2 हजार 500 रुपये क्विंटल तर किमान 3 हजार रुपये क्विंटल दर मिळाला. तुरीची 1 क्विंटल आवक झाली. तुरीला किमान 4 हजार 500 रुपये क्विंटल तर कमाल 4 हजार 500 रुपये क्विंटल दर मिळाला. हरभर्‍याची 153 क्विंटल आवक झाली. हरभर्‍याला किमान 5 हजार 200 रुपये तर कमाल 6 हजार 100 रुपये क्विंटल दर मिळाला. मक्याची 263 क्विंटल आवक झाली. मकेला किमान 2 हजार रुपये क्विंटल तर कमाल 2 हजार 500 रुपये क्विंटल दर मिळाला. घेवड्याची 47 क्विंटल आवक झाली. घेवड्याला किमान 4 हजार रुपये क्विंटल तर कमाल 5 हजार रुपये क्विंटल दर मिळाला. मुगाची 4 क्विंटल आवक झाली. मुगाला किमान 5 हजार 500 रुपये क्विंटल तर कमाल 7 हजार 50 रुपये दर मिळाला. उडदाची 4 क्विंटल आवक झाली. उडदाला किमान 8 हजार 500 रुपये क्विंटल दर कमाल 8 हजार 500 रुपये क्विंटल दर मिळाला.


Back to top button
Don`t copy text!