
दैनिक स्थैर्य । 8 एप्रिल 2025। फलटण । येथील बाजार समितीमध्ये विविध धान्यांची आवक झाली आहे. त्यामधील धान्याचे घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे – ज्वारी 604 क्लिंटल आवक झाली आहे.
किमान 2 हजार 400 रुपये ते कमाल 4 हजार रुपये दर मिळाला. बाजरी 413 क्लिंटल आवक झाली असून किमान 2 हजार 300 रुपये क्विंटल ते कमाल 3 हजार 100 क्लिंटल रुपये दर मिळाला. गहू 1 हजार 305 क्विंटल आवक झाली असून किमान 2 हजार 500 रुपये क्विंटल ते कमाल 3 हजार 100 रुपये क्विंटल दर मिळाला. खपली गहू 2 क्विंटल आवक झाली असून त्याला 3 हजार 700 क्विंटल दर मिळाला. उडीद 2 क्विंटल आवक झाली. त्याला 6000 रुपये क्विंटल दर मिळाला. हरभरा 431 क्विंटल आवक झाली.
त्याला किमान 5 हजार 500 ते कमाल 6 हजार 351 रुपये दर मिळाला. मका 363 क्विंटल आवक झाली असून कमाल 2 हजार 100 ते कमाल 2 हजार 351 रुपये दर मिळाला. घेवडा 75 क्विंटल आवक झाली असून. त्याला किमान 4 हजार 500 रुपये क्विंटल ते 7 हजार 500 क्विंटल दर मिळाला. तूर 10 क्विंटल आवक झाली असून कमाल 4 हजार 500 रुपये क्विंटल ते कमाल 6 हजार 500 रुपये क्विंटल दर मिळाला.