राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी विमानतळावर आगमन


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२३ । शिर्डी । राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने  शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी विमानतळावर  विमानाने आगमन झाल्यानंतर  राज्यपाल रमेश बैस, राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्वागत केले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही राष्ट्रपतींचे स्वागत केले.


Back to top button
Don`t copy text!