
दैनिक स्थैर्य । दि. २१ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील गिरवी येथे फलटण एज्युकेशन सोसायटीचे , महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय , फलटण येथील कृषीकन्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा सरपंच , ग्राम विकास अधिकारी , कृषी सहाय्यक व समस्त ग्रामस्थ यांच्यातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी गिरवीचे सरपंच शरद मेघा मदने , ग्रामविकास अधिकारी आर. सी. साळुंखे , कृषी सहाय्यक सुनील सोनवलकर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर , कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नीतिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या मोनिका बत्ते, भाग्यश्री बुरुड, समृद्धी नकाते , संजीवनी पेंडाळे , सिमरन तांबे , स्नेहल तांबे व अंकिता वायसे यांनी गिरवी येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले व ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ह्या कृषीकन्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.