दैनिक स्थैर्य । दि. १३ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील सासकल येथे फलटण एज्युकेशन सोसायटीचे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त, कृषी महाविद्यालय फलटण यांचे आगमन झाले आहे. त्यांचा समस्त ग्रामस्थ व सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी सासकलचे सरपंच उषा फुले, ग्रामसेवक अशोक मिंड, माजी सरपंच मोहन मुळीक यांच्यासह गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन.एस. ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. पंडित, प्रा. एस. वाय. लाळगे, यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या वैभवी ढमे, शिल्पा भिसे, दिप्ती भोईटे, मैथिली पोरे, अस्मिता सावंत, गौरी रणदिवे, आर्या शिंदे यांनी सासकल येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले व ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या कृषिकन्या येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.