स्थैर्य, सातारा, दि. ०४ : वंदेभारत या मिशनअंतर्गत चवथ्या टप्प्याची सुरुवात 10 मे 2020 ते 31 जुलै 2020 अखेर परदेशातून पहिल्या टप्प्या अखेर 6 हजार 249 व्य्क्तींचे आगमन झालेले आहे. पाचव्या टप्पयामध्ये 10 मे 2020 ते आज अखेर 191 व्यक्तींचे आगमन झाले आहे. यामध्ये पुणे जिल्हयातील 5 हजार 275 सातारा जिल्हयातील 344, सांगली जिल्हयातील 249, सोलापूर जिल्हयातील 299 तर कोल्हापूर जिल्हयातील 273 व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.