
स्थैर्य, फलटण, दि. १७ सप्टेंबर: फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवार, दि. १६ सप्टेंबर रोजी झालेल्या कांदा लिलावात १९४० क्विंटल (३८८० पिशवी) कांद्याची आवक झाली. यावेळी कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, कमाल १५०० रुपये, तर सरासरी १००० रुपये इतका दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.