दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । सातारा । वनविभागाचे कर्मचारी रात्रगस्त घालत असताना मौजे गजवडी गावाच्या हद्दीत फणस, अकेशिया झाडांच्या लाकडांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि क्रेनवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सांगली व सातारा जिल्ह्यातील दोघांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.
वनविभागाने दिलेली माहितीनुसार वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रगस्त घालत होते. यावेळी गजवडी गावच्या हद्दीत लाकडांची अवैधरित्या वाहतूक केली जात होती. या वाहतूकीतील वाहन ट्रक (क्र. एम. एच 10 सी. आर. 4891) पकडण्यात आला. तर सदरचा लाकूड भरण्यासाठी वापरणेत आलेली क्रेन वाहन (क्र. एम.एच. 11 सी. डब्ल्यु. 1140) देखील जप्त करणेत आली.
सदर प्रकरणी विजय दत्तात्रय साठे (रा.कवठे महाकाळ, जि.सांगली), मयुर सतीश फणसे (रा.देगांव ता. जि. सातारा) यांचेवर कारवाई करणेत आली. अवैध वृक्षतोड करणे तसेच त्याची विनापरवाना वाहतूक करणे हे भारतीय वन अधिनियम, 1927 नुसार गुन्हा आहे.