बबन गोखले यांच्या खून प्रकरणातील बोलवत्या धन्याला अटक करा मृत गोखलेंच्या पत्नीची पत्रकार परिषदेत मागणी


स्थैर्य, सातारा, दि.२५: बबन गोखले खून प्रकरणात आणखी तिसरा आरोपी असून त्याला तत्काळ अटक करावी तसेच या या खुनापाठीमागे बोलवता धनी वेगळाच असून पोलिसांनी मुख्य सूत्रधारा पर्यंत पोहोचावे, अशी मागणी मृत बबन गोखले यांच्या पत्नी अलका गोखले यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी जनता क्रांती दलाच्या सातारा जिल्हा महिला अध्यक्ष पूजा भातकर, भटक्या जमाती संघटनेचे सरचिटणीस प्राध्यापक एच. एम. नलावडे उपस्थित होते.
अलका गोखले म्हणाल्या, माझे पती बबन हनुमंत गोखले यांचा शुभम कदम आणि सचिन माळवे (रा. मंगळवार पेठ, सातारा) या दोघांनी पूर्वनियोजित कट रचून हा खून केला आहे. यामध्ये तिसरा आरोपी असून त्याला अद्याप पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने अटक करावी. या हत्येमागे बोलविता धनी दुसराच कोणीतरी असून पोलिसांनी त्याची पाळेमुळे खणून काढावीत.
आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यातील माळवे हा मुंबईहून साताऱ्यात आला आहे. त्याला बोगदा परिसरातील त्याच्या नातेवाईकांचा अभय असून त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. प्राध्यापक नलावडे म्हणाले, हा खून अंडी देण्याच्या कारणावरून केलेला नसून हा एक ठरवून केलेले कृत्य आहे. तरी त्यामागील खरे कारण व खरा सूत्रधार शोधण्यास पोलिसांनी प्रयत्न करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

Back to top button
Don`t copy text!