अर्जुन यादव खून प्रकरणातील सूत्रधाराला मुंबई येथून अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२२ । सातारा ।  सातारा शहर परिसरातील नटराज मंदिर येथे वाई येथील अर्जुन यादव या इसमांचा काही दिवसापूर्वी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांना हवे असलेले मूळ सूत्रधार व रेकॉर्डवरील आरोपी अभिजीत उर्फ भैया शिवाजी मोरे राहणार गंगापूरी वाई व सोमनाथ बंडू शिंदे राहणार रविवार पेठ वाई यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यांच्या नुकत्याच मुस्क्या आवडल्या पुण्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सदरचा संवेदनशील गुन्हा उघड करून पुण्यातील सर्व पाच आरोपींना अटक करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.

दिनांक 2 जुलै 2022 रोजी दुपारी साडेतीन वाजता सातारा शहरातील नटराज मंदिर परिसरात दोन अज्ञात इसमांनी अर्जुन यादव राहणार वाई या इसमाचा खून केला होता . सदर गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये झाली होती हा खून कोणी व कशासाठी केला या तपासाचे मोठ्या आव्हान सातारा पोलिसांसमोर उभे राहिले होते .पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी घटनास्थळाची पाहणी करून हा गुन्हा तातडीने उघड करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे आणि गुन्हे शाखेचे एक तपास पथक तयार करण्यात आले चार जुलै रोजी पुण्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.

मात्र गुन्ह्यातील मूळ आरोपी अभिजीत शिवाजी मोरे व सोमनाथ बंडू शिंदे हे मात्र फरार होते त्यामुळे त्यांना शोधण्याचे आवाहन होते सदर गुन्ह्याच्या समांतर तपासा दरम्यान धुमाळ यांना आरोपी शिंदे व मोरे हे दोघेही मुंबई येथे मानखुर्द येथे असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तेथे तत्काळ रवाना झाले व ते मानखुर्द येथे आरोपींच्या ठाव ठिकाण याबाबत माहिती प्राप्त करून दोन्ही आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली या खून प्रकरणातील पाचही आरोपींना गजाळ करण्याची धडक कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक रमेश गरजे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील पोलीस आमदार विश्वनाथ संघपाल आतिष गाडगे संजय शिर्के विजय कांबळे शरद बेबले लक्ष्मण जगधने प्रवीण फडतरे निलेश काटकर गणेश कापरे मुनीर मुल्ला प्रमोद सावंत अमित सपकाळ विशाल पवार रोहित निकम सचिन ससाने यांनी भाग घेतला होता.


Back to top button
Don`t copy text!