फलटणमध्ये जनावरांची कत्तल करणाऱ्यांना अटक; ३२ लाख ८३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ११ : फलटण येथील आखरी रस्ता कुरेशी नगर फलटण येथे जाकीर कुरेशी यांचे घराचे पाठीमागे असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये वाजिद जाकीर कुरेशी, इलाही हुसेन कुरेशी, गौस रहीम कुरेशी, तोसिफ अनिस कुरेशी, अरबाज नियाज कुरेशी सर्व रा. मंगळवार पेठ, फलटण हे अवैधरित्या कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना जनावरांची कत्तल करीत असताना मिळून आलेले आहेत. त्यांच्या येथे एकूण ४० वासरे दाटीवाटीने टेम्पो गाडीत भरलेल्या स्थितीत मिळून आली. पोलीस व पंच येण्याची चाहूल लागताच तोसिफ कुरेशी व अरबाज कुरेशी यांना पळून जाण्यात यश आलेले आहे. सदर ठिकाणी ६५० किलो जनावरांचे मास, ४० लहान जर्शी गाईची वासरे, टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो क्रमांक एमएच २० एफ ६७८८, पांढरी रंगाची इनोवा कार क्रमांक एमएच ०१ व्ही ९८६०, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, दोन मोबाईल हँडसेट असा एकूण रुपये ३२ लाख ८३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली.

या बाबत पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी कि, दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कुरेशी नगर, फलटण येथे जाकीर कुरेशी याचे घराचे पाठीमागे असले पत्र्याचे शेड मध्ये अवैधरित्या कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना जनावरांची कत्तल करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे फलटण शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सदर ठिकाणी धाड टाकून महाराष्ट्र प्राणी संरक्षण व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये वाजिद जाकीर कुरेशी, इलाही हुसेन कुरेशी, गौस रहीम कुरेशी, तोसीब अनीश कुरेशी, अरबाज नियाज कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई हि फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सपोनि नवनाथ गायकवाड, सचिन रावळ, सपोफौ शिंदे, शिंदे, घाटगे, खाडे, येळे, करपे, हिवरकर, गोसावी, जाधव, भिसे यांनी केली तर पुढील तपास सचिन रावळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!