दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । सातारा । देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र दामोदरदास मोदी यांना ‘मारहाण’ करण्याची धमकी दिल्या बद्दल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंना अटक करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली . या बाबतची तक्रार भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांनी सातारा शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक श्री भगवानराव निंबाळकर यांच्याकडे लेखी स्वरूपात दाखल केली
तक्रारीत म्हणले आहे की,देशाचे पंतप्रधान हे भारतीय राज्य घटनेनुसार सर्वोच्च पद आहे. त्यांची सुरक्षितता हा सर्व भारतीय व सुरक्षा यंत्रणांचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कोणतेही गैरविधान, गैरकृत्य हे देशाच्या तसेच सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षे विषयी उचल्लेले विरूध्द पाऊल असते. अशाा नेत्या विषयी जाणीवपुर्वक अपशब्द वापरणे, त्यांना मारहाण करण्याची भाषा वापरणे, त्यांच्या हत्तेचा कट रचने या सर्व बाबी देशद्रोहाच्या गुन्हयामध्ये मोडतात.
राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष, श्री. नाना फाल्गुनराव पटोले, आमदार भंडारा विधानसभा यांनी काल दि. १७/०१/२०२२ रोजी भंडारा येथे कार्यकर्त्यांना संबोधीत करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशुन, मी मोदीला मारू शकतो’, शिव्याही देऊ शकतो, असे असंसदीय, गुन्हेगारी प्रवृत्तीचे व देशाचे पंतप्रधान यांच्या विषयी त्यांना शारिरीक इजा पोहचविण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांना हाताशी धरून कटकारस्थान रचले आहे हे स्पष्ट होत आहे.
या वेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रशांत खामकर,शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ सचिन साळुंखे, भटके विमुक्त महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रिया नाईक, शहर उपाध्यक्ष नितीन कदम, शहर चिटणीस रवी आपटे,उद्योजक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल टंकसाळे, युवा मोर्च्या शहराध्यक्ष विक्रम बोराटे, ओ बी सी मोर्च्याचे अविनाश क्षीरसागर , पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते