दैनिक स्थैर्य | दि. ०८ नोव्हेंबर २०२१ | फलटण | फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथे सन २०२१ – २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर यांनी केले आहे.
दि. ५ ते १८ नोव्हेंबर २०२१ दरम्यान सदर प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय, फलटण कोड नंबर १२१६९ आणि कृषी महाविद्यालय, फलटण कोड नंबर ११२०५ असून प्रवेश क्षमता बी. एस्सी. (ऑनर्स) हॉर्तीकल्चर ८० आणि बी. एस्सी. (ऑनर्स) ऍग्रीकल्चर १२० असल्याचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
प्रवेशासंबंधी व अन्य माहितीसाठी श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल (शेती शाळा) येथे संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9423967567, 9860595005, 9730765873, 9975377936 सदरील क्रमांकावर संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.