दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२२ । तरडगाव । श्री संत तुकाराम महाराज यांच्या बिज निमित्ताने फलटण तालुक्यातील नांदल येथे दि. १३ मार्च ते दि. २० मार्च पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ह. भ. प. विश्वास अप्पा कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे.
दि. १९ मार्च रोजी दुपारी २ वाजुन ३० मिनिटांनी ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे व गाथेचे पुजन करून नगरप्रदक्षिणा संपन्न होणार आहे.