दैनिक स्थैर्य | दि. २९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण केंद्र क्रमांक १००२ येथे बैठक क्रमांक एफओ २४६०४ ते एफओ २५१०४ या एकूण ५०१ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे.
विद्यार्थ्यांनी केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेशपत्र (रिसीट), ओळखपत्र व लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात निर्धारित वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे. उशिरा येणार्या परीक्षार्थीस परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षा केंद्राच्या आवारात तसेच परीक्षा केंद्रावर भ्रमणध्वनी, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, कॅल्क्युलेटर इ. तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने किंवा उपकरणे बाळगण्यास सक्त मनाई आहे.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा द्यावी. परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केंद्र संचालक प्राचार्या रायते जे. व्ही., उपकेंद्र संचालक मुख्याध्यापक श्री. सूर्यवंशी एस. व्ही. यांनी केले आहे.