कोळकीच्या स्मशानभूमीमध्ये लाईट व्यवस्था करा; कोरोनामुळे निधन झालेल्यांचे दहन होत आहे याच स्मशानभूमीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, कोळकी, दि. १७ : सध्या फलटणसह सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेली आहेत. यासोबतच फलटण तालुक्यामध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होत आहे व अशा सर्वांचे दहन हे कोळकी ग्रामपंचायतीच्या असलेल्या स्मशानभूमीमध्ये केले जाते. परंतु येथे लाईटची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी गाडीच्या लाईटच्या प्रकाशात मध्ये दहन करण्याची वेळ कोरोना योध्द्यांवर येत आहे. तरी लवकरात लवकर कोळकी ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीमध्ये लाइटची व्यवस्था करावी. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधी मधून असलेले हायमास्ट बल्प हे फलटण शहरासह कोळकीमध्ये विविध चौकाचौकांमध्ये लागलेले आहेत. तरी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दखल घेऊन कोळकी ग्रामपंचायतीच्या असलेल्या स्मशानभूमीमध्ये काही हायमास्ट दिवे लावावेत, अशी मागणी सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!