अर्णव गोस्वामींच्या अर्जावर हायकोर्टात आज सुनावणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.१९: मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीची कंपनी एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि या वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर आता सोमवारी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

याप्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींच्या पीठाने गुरुवारी कंपनीला फटकारले होते. ‘तुमच्या वरळीमधील कार्यालयापासून मुंबई उच्च न्यायालय अगदीच जवळ आहे. त्यामुळे उच्च न्यायालयावर विश्वास ठेवा आणि तिथे आधी दाद मागा’, अशा शब्दांत पीठाने सुनावले होते. तसेच उच्च न्यायालयात याचिका करण्याची मुभा देऊन कंपनीची याचिका फेटाळली होती. त्यानंतर कंपनीने तातडीने उच्च न्यायालयात धाव घेऊन मुंबई पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करावा, अशी विनंती याचिकेत केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कंपनीची बाजू ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांनी मांडली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!