अर्कशाळेच्या नवीन विक्री केंद्राचा शनिवारी शुभारंभ

बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार उद्घाटन 


स्थैर्य, सातारा, दि. 7 नोव्हेंबर : आपल्या सुप्रसिद्ध अशा आयुर्वेदिक औषधांनी संपूर्ण जगभर आपली उत्पादने विक्री करणार्‍या आणि शंभर वर्षांची आरोग्य सेवा परंपरा लाभलेल्या आयुर्वेदिक अर्क शाळेच्या वतीने असंख्य ग्राहकांच्या आग्रहाखातर अर्क शाळेच्या नवीन विक्री केंद्राचा भव्य शुभारंभ येत्या शनिवार, दि, 8नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता संपन्न होणार आहे .
अर्कशाळा संस्थेचे माजी चेअरमन व सुप्रसिद्ध धन्वंतरी स्वर्गीय डॉ.रवींद्र हर्षे यांच्या जयंतीदिनी हा शुभारंभ सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्री. छ. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या शुभहस्ते व श्रीमती शोभा रवींद्र हर्षे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे .अशी माहिती आयुर्वेदिक शाळा संस्थेचे चेअरमन डॉ.धनंजय बोधे यांनी दिली .
हा कार्यक्रम सातारा शहरातील श्री. छ. शाहू क्रीडा संकुलानजीकच्या भूविकास पेट्रोल पंपाशेजारी डॉ. रवींद्र हर्षे यांच्या दवाखाना परिसरात होणार असून या कार्यक्रमास समस्त सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयुर्वेदिक अर्कशाळा संस्थेचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे


Back to top button
Don`t copy text!