दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२१ | सातारा | येथील निर्भया पोलीस चौकीमध्ये येथे कर्तव्यावर असणार्या पोलिस हवालदारास मारहाण करणार्यास सातारा एलसीबीच्या पथकाने चार तासात अटक केली. त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, पो.कॉ. सुहास जगन्नाथ कदम हे कर्तव्यावर हजर असताना सायन्स कॉलेजचा विद्यार्थी जयराज धनंजय जाधव रा. काशिळ, ता. कराड हा आला व त्यास तीन मुलांनी मारहाण केल्याची तक्रार दिली. तक्रारीनुसार पो.कॉ. सुहास कदम यांनी तिघांपैकी एकाच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन त्यास निर्भया पोलीस चौकी येथे येण्यास सांगितले. यावेळी संबधित आरोपीने निर्भया पोलीस चौकीमध्ये येवून फिर्यादीस आरेरावीची भाषा वापरुन फिर्यादीच्या वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. याप्रकरणी याबाबत पो.कॉ. सुहास कदम यांनी तक्रार दिली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
शासकिय नोकरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने गुन्हयातील आरोपीस तात्काळ अटक करुन कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करण्यात आले होते. त्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेवून त्यास 4 तासाचे आत ताब्यात घेवून पुढील कारवाईकरीता सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.