दैनिक स्थैर्य । दि.३० मार्च २०२२ । सातारा । सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या क्षेत्रासाठी 48 कोटी रुपयांचा आराखडा नगर विकास विभागाने मंजूर केला असून या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे . या निधीचा पहिला टप्पा लवकरच नगरपालिकेला प्राप्त होणार असल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात असे नमूद आहे की शहराच्या हद्दवाढीला समाविष्ट झालेल्या भागासाठी 51 कोटी रुपयांचा विकास आराखडा सातारा विकास आघाडी तयार केला होता . शाहूनगर विलासपूर संभाजीनगर दरे खुर्द या सर्व भागांना अद्ययावत पायाभूत सुविधा मिळाव्यात याकरिता 48 कोटी रुपयांचे प्रस्ताव सातारा नगरपालिकेने अत्यंत मेहनतीने तयार करून नगर विकास विभागाला सादर केले होते . या सर्व कामांना नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे . गत महिन्यात 58 कोटी रुपयांच्या प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळून दहा कोटी रुपयांचा पहिला हप्ता पालिकेला प्राप्त झाला आहे . चैत्र शुद्ध पाडव्याच्या निमित्ताने सातारकर यांनाही विशेष भेट मिळाली असल्याचे उदयनराजे भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे . हद्दवाढीच्या क्षेत्रातील सर्व नागरिकांना मूलभूत आणि अद्ययावत सुविधा मिळायला हव्यात हे सातारा विकास आघाडीचे उद्दिष्ट आहे याच जाणिवेतून आम्ही या सगळ्या सुविधांचे प्रस्ताव सादर केले होते.
सातारा पालिकेने हद्दवाढ भागातील परिसरातील सूक्ष्म पाणी करून तेथे खालील कामे निर्देशीत केली आहेत . हद्दवाढीच्या भागात तब्बल सोळा कोटी रूपयांचे रस्ते केले जाणार आहेत .याशिवाय चार बाय सहा व सहा बाय सात रुंदीची दहा कोटी रुपयांची रस्त्याच्या दुतर्फा गटारांची बांधकाम केली जाणार आहेत . विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट उभारण्यासाठी 3 कोटी 48 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत मोकळ्या जागांचा विकास आणि वृक्षारोपण करण्यासाठी चार कोटी 63 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण याकरिता चार कोटी 33 लाख रुपये मंजूर झाले आहेत मंजूर झालेल्या कामांची लवकरच सुरुवात करणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांना आश्वासन दिले आहे तसेच शाहूनगर च्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 28 कोटी रुपयांचा सादर केलेले प्रस्ताव लवकरच मंजूर होईल असा आशावाद त्यांनी पत्रकाच्या शेवटी व्यक्त केला आहे.