दैनिक स्थैर्य । दि.११ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नसून मिळणारे नगरपालिकेला अनुदानही अपुरे असल्याची तक्रार सातारा म्यूनिसिपल कामगार युनियन च्या वतीने मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे करण्यात आली.
सोमवारी सायंकाळी मुख्याधिकारी बापट यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कामगार संघटनेचे उपाध्यक्ष निशांत पाटील सचिव मनोज बिवाल व अन्य सदस्य उपस्थित होते या बैठकीमध्ये डिसेंबर 2019 मासिक अनुदान अद्यापही सातारा नगरपरिषद प्राप्त झालेले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शन व इतर विविध हप्ते वेळेत जमा होण्यास अडचणी होत आहेत अशी तक्रार यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.
सहाय्यक आयुक्त नगरपरिषद संचालनालय यांना सहा जानेवारी दोन हजार बावीस च्या पत्रान्वये अनुदान प्राप्तीचे कळविण्यात आले आहे त्यामुळे ते प्राप्त होताच वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल असे आश्वासन अभिजीत बापट यांनी केले दिनांक 18 जानेवारी अखेर कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा होईल यासाठी कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले करोनाचा संसर्ग सातारा शहरात सुरू असून कर्मचाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी यापूर्वीही करोना च्या काळात पालिका कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले आहे अशी अपेक्षा मुख्याधिकारी यांनी व्यक्त केली पालिकेची आर्थिक अडचण लक्षात घेऊन तातडीने संपात निर्णय घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले तसेच बिंदु नामावली व कालबद्ध पदोन्नती हे विषय येत्या 31 जानेवारी पर्यंत संपविले जातील पद् पदकतालिके वरील 545 कर्मचाऱ्यांना पैकी 214 कर्मचाऱ्यांचा बिंदूनामावली तक्ता नगर परिषद संचालनालय कार्यालय वरळी येथे पाठवण्यात आला आहे . पदांची रिक्तता आणि आरक्षण यानुसार पदांना मान्यता देण्यात येईल असे मुख्याधिकारी बापट यांनी स्पष्ट केले.