राज्यपालांकडून कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप; डॉ. संजय ओक, डॉ. उदवाडीया, डॉ. म्हैसेकर सन्मानित


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (दि. २६) राज्य शासनाच्या कोविड कृती दलाच्या सदस्यांचा कोरोना काळातील सेवेबद्दल राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

संपूर्ण राज्यातील कोविड व्यवस्थापन, वेळोवेळी केलेली औषध योजना व त्यानंतर लसीकरण या सर्व क्षेत्रात यशस्वीपणे मार्गदर्शन केल्याबद्दल राज्यपालांनी कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप दिली.

दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी स्थापन केलेल्या १६ सदस्यांच्या कोविड कृती दलाने प्रत्येक सोमवारी न चुकता ऑनलाईन बैठक घेतली, तसेच जगाच्या विविध भागातील कोरोना परिस्थितीचा नियमितपणे आढावा घेतला व औषध योजना केली तसेच लसीकरणाची आखणी केली असे कृती दलाचे अध्यक्ष डॉ संजय ओक यांनी राज्यपालांना सांगितले.

यावेळी डॉ संजय ओक यांचेसह डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ झरीर उदवाडीया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. केदार तोरसकर, डॉ. नितीन कर्णिक, डॉ. झहिर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ खुस्राव बाजन, डॉ अजित देसाई तसेच मृणाल कोले यांचा राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!