अनुकंपा व गट-क उमेदवारांना पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते शनिवारी नियुक्ती आदेशांचे वाटप


स्थैर्य, फलटण, दि. 3 ऑक्टोबर : सातारा जिल्ह्यातील अनुकंपाधारक उमेदवार आणि महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा २०२३ मधील शिफारस प्राप्त लिपिक-टंकलेखक पदाच्या उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वाटप शनिवारी, दि. ४ ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात होणार असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.

राज्य शासनाने अनुकंपा नियुक्तीबाबतचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार, मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यात या नियुक्त्या दिल्या जात आहेत.

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, कार्यालय प्रमुख आणि नियुक्ती प्राधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संबंधितांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!