दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यातील मोळ (ता. खटाव) येथील दिवंगत बाबुराव बनसोडे यांचे नातू व सीमा सुरक्षा दलाचे सेवानिवृत्त सैनिक अनिल बाबुराव बनसोडे यांचे चिरंजीव तुषार अनिल बनसोडे यांची आर्टलरी रेजिमेंट मध्ये ‘लेफ्टनंट’ पदावर भारतीय स्थलसेना मध्ये कमीशन झाले आहे. सरसेनापती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत ध्वजसंचालना नंतर डेहराडून येथे हे कमिशन देण्यात आले. नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) पुणे व इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) डेहराडून येथील चार वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. सैनिक स्कूल, सातारा येथून १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) पुणे येथे देशभरातून निवडक विद्यार्थ्यांमध्ये त्यांची निवड झाली. अनिल बनसोडे यांचा दुसरा मुलगा चिरंजीव शुभम याची गेल्यावर्षी जेईई मधून आयआयटी रुडकी येथे B.Tech (Computer Science) साठी निवड झाली असून सध्या तो द्वितीय वर्षामध्ये शिकत आहे.
अनिल बनसोडे व त्यांच्या कुटुबियांनी आपल्या दोन्ही मुलांवर योग्य संस्कार मार्गदर्शन करुन उल्लेखनीय कार्य केले.
याबाबत त्याचे सर्व नातेवाईक सातारारोड, मोळ ,सातारा येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.