
दैनिक स्थैर्य | दि. 25 एप्रिल 2025 | मुंबई | महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सन 2024-2025 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची तसेच समिती प्रमुखांची नियुक्ती केली आहे. समिती पद्धतीला संसदीय लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नि:सत्र कालावधीत समिती कामकाजाच्या माध्यमातून कायदेमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रणाचे कार्य सुरु असते. भारतीय राज्यघटनेतील सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन (Check and Balance) हे तत्व समितीपध्दतीमुळे अधिक प्रभावीपणे अंमलात येत असते. यामध्ये विधिमंडळाच्या विविध समितींवर विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना विधिमंडळ कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांची नियुक्ती हि विविध समितींवर केली आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आलेल्या समिती पुढील प्रमाणे…
मराठी भाषा समिती (विधानपरिषद नियम 214 ड)
(1) संजय केनेकर, वि.प.स.
(2) श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, वि.प.स.
(3) अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.
(4) जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.
नियम समिती (विधानपरिषद नियम 218)
समिती प्रमुख : प्रा. राम शिंदे, सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.
सदस्य
(2) श्री.प्रविण दरेकर, वि.प.स.
(3) श्री.निरंजन डावखरे, वि.प.स.
(4) श्रीमती भावना गवळी, वि.प.स.
(5) श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, वि.प.स.
(6) श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, वि.प.स.
(7) ॲङ.अनिल परब, वि.प.स.
विशेष निमंत्रित : श्रीमती उमा खापरे, वि.प.स.
वातावरणीय बदलासंदर्भातील संयुक्त तदर्थ समिती
समिती प्रमुख : प्रा. राम शिंदे, सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.
सह समिती प्रमुख : ॲड. राहुल नार्वेकर, अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा.
सदस्य
(1) श्री.निरंजन डावखरे, वि.प.स.
(2) श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, वि.प.स.
(3) श्री.राजेश राठोड, वि.प.स.
(4) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.