दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
निंबळक, ता. फलटण येथील श्री. शंभूसिंह पृथ्वीराज नाईक निंबाळकर यांची संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, प्रदेश महासचिव सुभाष बोरकर यांनी शंभूसिंह नाईक निंबाळकर यांना प्रदान केले.
शंभूसिंह नाईक निंबाळकर हे संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते असून त्यांच्या कार्याची दखल घेत ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीने त्यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अधिक जोमाने कार्य करून संघटनेचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा त्यांना राज्य कार्यकारिणीने दिल्या आहेत.