स्थैर्य, फलटण, दि.२: गेल्या काही महिन्यांपासून फलटणचे तहसिलदार पद हे रिक्त होते. अतिरिक्त कार्यभार निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटिल यांच्याकडे देण्यात आलेला होता. त्यानंतर आता फलटणच्या तहसीलदारपदी समीर यादव यांची नियुक्ती झाली असल्याचे समोर येत आहे.
फलटणचे तहसिलदार हणमंतराव पाटील यांची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली होती. त्यानंतर फलटणचे तहसीलदार पद रिक्त होते व परंतु तहसिलदार पदाचा कार्यभार हा निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांच्याकडे होता. त्यानंतर आठ ते दहा महिन्यांनंतर फलटणच्या तहसिलदारपदी समीर यादव यांची नियुक्ती झालेली समोर येत आहे.
फलटणच्या तहसीलदार पदी नियुक्त झालेले समीर मोहन यादव हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सहाय्यक पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत होते. समीर यादव यांच्याकडे पाटण तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.