एंजल ब्रोकिंगच्या चीफ ग्रोथ ऑफिसरपदी प्रभाकर तिवारी यांची नियुक्ती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य ,मुंबई, दि. ०४: एंजल ब्रोकिंग या देशातील चौथ्या सर्वात मोठ्या ब्रोकरेज हाऊसने सीएमओ श्री प्रभाकर तिवारी यांची नवे चीफ ग्रोथ ऑफिसर म्हणून नियुक्ती केली. या नव्या भूमिकेत श्री प्रभाकर तिवारी हे एंजलमध्ये मार्केटिंगसह विक्री विभागाचे प्रमुख असतेल. ग्राहक अधिग्रहण आणि विक्री परिवर्तन या दोहोंचे उत्तरदायित्व त्यांच्यावर असेल.

आयआयएम बंगळुरूचे माजी विद्यार्थी, श्री प्रभाकर तिवारी यांनी २०१९ पासून एंजेल ब्रोकिंगच्या मार्केटिंग ट्रान्सफॉर्मेशनचे नेतृत्व केले आहे. विविध पुरस्कार प्राप्त मोहिमांद्वारे त्यांनी ब्रोकरेज हाऊसची दर्शनीयता वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. याकरिता वेब आणि अॅप अॅनलिटिक्स व एआय/एमएल आधारीत रिटार्गेटिंग कँपेनचा वापर करत मार्केटिंग व तंत्रज्ञान एकिकरणावर त्यांनी भर दिला. यापूर्वी त्यांनी मेरीको, सीईएटी आणि पेयूसारख्या अनेक आघाडीच्या ग्राहक व डिजिटल कंपन्यांमध्ये प्रमुख पदांवर काम केले आहे.

एंजल ब्रोकिंगचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “ मला ठाम विश्वास आहे की, योग्य केपीआयबरोबर फक्त उच्च तंत्रज्ञान वापरल्यास कोणत्याही बिझनेसमध्ये चांगले परिणाम मिळतात. मार्केटिंगमध्ये आम्ही हेच केले आणि प्रत्यक्ष स्वरुपात अप्रतिम परिणाम मिळवले. आज, माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहेच, पण यासोबतच सेल्स व सेल्स ट्रान्सफॉर्मेशनमधील अतिरिक्त जबाबदारीही आली आहे. मार्केट नेतृत्वात वेगाने प्रगती करण्याच्या पुढील टप्प्यावर मी लक्ष केंद्रित करेल.”

एंजल ब्रोकिंगचे सीईओ श्री विनय अग्रवाल म्हणाले, “या भूमिकेसाठी प्रभाकर हे धोरणात्मकदृष्ट्या योग्य व्यक्ती आहेत. व्यावसायिक योजना आखताना त्यांचे विचार स्पष्ट असतात. त्यांच्या डेटा आधारीत कार्यपद्धतीमुळे आमच्या बिझनेस वाढवण्याच्या प्रयत्नांना आणखी महत्त्व प्राप्त झाले. एंजल ब्रोकिंगच्या वृद्धीचा पुढचा टप्पा गाठण्यात, विशेषत: प्रमुख स्थान मिळवण्यात प्रभाकर यांची महत्त्वाची भूमिका असेल, अशी मला खात्री आहे.”


Back to top button
Don`t copy text!