भाजपा प्रदेश सचिवपदी पावसकर यांची नियुक्ती


दैनिक स्थैर्य । दि.२१ मार्च २०२२ । मुंबई । भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिवपदी सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हाध्यक्षपदी आ. जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबतची घोषणा सोमवारी केली.

मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लीगल सेलचे महासचिव अखिलेश चौबे यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय या वेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!