स्थैर्य, मुंबई, दि. २६: फिनटेक फर्स्ट हे उद्दिष्ट समोर ठेवत फिनटेक ब्रोकरेज कंपनी एंजल ब्रोकिंगने सिलिकॉन व्हॅलीतील अनुभवी श्री नारायण गंगाधर यांची सीईओपदी नियुक्ती केली आहे. नारायण यांना गूगल, मायक्रोसॉफ्ट, ऍमेझॉन आणि उबेर यासारख्या तंत्रज्ञान व्यवसायातील जागतिक पातळीवरील आघाडीच्या सिलिकॉन व्हॅलीतील शीर्ष कंपन्यांमध्ये कामाचा दोन दशकांचा अनुभव आहे. उत्पादन, तंत्रज्ञान, क्षमता वाढवणे आणि ऑटोमेशन प्रक्रियेत नूतनीकरण करून अत्यंत क्रांतिकारी बिझनेसचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
या नियुक्तीबद्दल एंजल ब्रोकिंगचे सीईओ श्री नारायण गंगाधर म्हणाले, “अनेक लोक सध्या तंत्रज्ञानाला आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवत असल्याने भारतीय बाजार हा एका महत्त्वाच्या वळणावर आहे. सीईओ या नात्याने, सर्व स्टेकहोल्डर्ससाठी उत्कृष्ट कार्यक्षमता सिद्ध करण्यावर मी लक्ष केंद्रीत करेन. सामान्य बाजारपेठेत आपले उत्पादन खूप सहज उपलब्ध होणे, हे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी मला ही संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. एंजल ब्रोकिंग आणि त्याही पलीकडे प्रत्येकाला अपेक्षित असे सहकार्य करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
एंजल ब्रोकिंगचे सीएमडी श्री दिनेश ठक्कर म्हणाले, “या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एंजल ब्रोकिंगचे नेतृत्व करण्यासाठी नारायण हे योग्य व्यक्ती आहेत. नेतृत्व गुण असलेले ते अष्टपैलू इंजिनिअर आहेत. त्यामुळे सध्याच्या डिजिटल ऍसेटमध्ये ते महत्त्वपूर्ण वृद्धी घडवून आणू शकतात. तसेच भारतातील सर्वाधिक पसंतीची फिनटेक कंपनी होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात ते आपली मदत करू शकतील. आपल्या टीमचे नेतृत्व नारायण यांच्याकडे असताना आपण निश्चितच नवी उंची गाठून आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड ऍप्स तयार करू शकू. जागतिक दर्जाचा ग्राहक अनुभव, सर्वोत्कृष्ट एआय/एमएल सेवा पुरवत नव्या आणि वर्तमानातील ग्राहकांना गुंतवणूक तसेच ट्रेडिंग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास यामुळे मदत होईल.”
नारायण हे सॅन फ्रॅन्सिस्को येथे उबेर कंपनीत टेक्नोलॉजी हेड होते. तेथे त्यांनी पायाभूत सुविधा, मशीन लर्निंग, डेटा प्लॅटफॉर्म आणि डेटा सायन्सच्या जागतिक पातळीवरील ६५०+ कर्मचाऱ्यांच्या टीमचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात, उबेरने दैनंदिन १४ दशलक्ष+ ट्रिप्स पूर्ण करत जगभरातील ४०० पेक्षा जास्त शहरांमध्ये विस्तार केला. गूगलमध्ये ते सिलिकॉन व्हॅलीतील ऑफिसच्या बाहेर कार्यरत होते. त्यांनी गूगलच्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस उदा. गूगल कंप्यूट इंजिन, गूगल क्लाउड एसक्यूएल, गूगल कंटेनर इंजिन यासारख्या सेवांचा पहिला सेट लाँच करणाऱ्या मोठ्या प्रॉडक्ट आणि इंजिनिअरिंग टीमचे नेतृत्व केले. गूगल ड्राइव्ह, गूगल डॉक्स इत्यादीसारख्या प्रॉडक्टिव्हिटी अॅपना पावर पुरवणाऱ्या सर्वांगीण ऍप्लिकेशन इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी जबाबदार असलेल्या टीमचे नेतृत्वही त्यांनी केले.
गूगलच्या आधी नारायण हे ऍमेझॉन वेब सर्व्हिसमध्ये जनरल मॅनेजर आणि डायरेक्टर होते. तेथे त्यांनी ऍमेझॉन क्लाउड डेटाबेस बिझनेस विकसित केले. सध्या ते सॅन फ्रान्सिस्को येथील रोबोटिक्स स्टार्टअपचे संस्थापक आणि सीईओ होते. या कंपनीने अर्बन मोबिलिटी सोल्युशन्सचे ऑटोमेशन केले. त्यांनी मॅडिसन लॉजिक, डिजिटल सेट यासारख्या टेक्नोलॉजी कंपन्यांच्या बोर्डावरही काम केले. तसेच आपल्या टीम आणि प्लॅटफॉर्मचा विकास करू पाहणाऱ्या नवोदित स्टार्टअपनाही मार्गदर्शन केले व त्यांना यशस्वी करून दाखवले.