दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२२ । मुंबई । ओळख प्रमाणपत्र व पासवर्डशिवाय सर्टिफिकेशन यांना एकीकृत करणारी कंपनी वनकॉस्मोसने रिझर्व्ह बँक माहिती तंत्रज्ञान प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक सीईओ श्री. नंदकुमार सरवडे यांची नियुक्ती आपल्या सल्लागार मंडळात केली आहे. फसवणूक प्रतिबंध, कायदा प्रवर्तन, बँकिंग आणि विनियमन क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ सुरक्षासंदर्भात काम केल्याचा अनुभव श्री. नंदकुमार यांच्याकडे आहे.
वनकॉस्मोसचे संस्थापक आणि सीईओ श्री हेमेन विमदलाल यांनी सांगितले, “आर्थिक सेवा, फसवणुकीस प्रतिबंध आणि अनुपालन क्षेत्रात श्री. नंदकुमार यांच्या विशेष नैपुण्यांसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले जाते.”
सायबर हल्ल्यांनी त्रस्त जगभरातील १११ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक तिसरा आहे. एशिया-पॅसिफिक क्षेत्रात तर भारत पहिल्या स्थानावर आहे. सायबर हल्ल्यांमध्ये सायबर गुन्हेगारांचे एक सिंडिकेट गुंतलेले असून ते एका संघटित पद्धतीने पासवर्ड चोरतात. सिंगापूरमधील सायबर सुरक्षा संशोधन कंपनी ग्रुप-आयबीने केलेल्या एका संशोधनात ही बाब निदर्शनास आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे.
संशोधनात आढळून आले आहे की सायबर गुन्हे समूह टेलिग्रामने भारतात २०२१च्या शेवटच्या दहा महिन्यांमध्ये १९,२४९ उपकरणे संक्रमित केली, २०२२च्या पहिल्या सात महिन्यांमध्ये ही संख्या ५३,९८८ पर्यंत वाढली. यामध्ये ४,६५७ बँक कार्ड आणि क्रिप्टो वॉलेट माहितीच्या ४,४२८ केसेसचा देखील समावेश आहे.