पुणे व कोल्हापूर महापालिकेच्या प्रभारी पदी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नियुक्ती : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे


स्थैर्य, फलटण, दि. ११ : पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून आणल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नुकतेच मुंबई येथे अभिनंदन करण्यात आलेले होते. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर अधिक विश्वास ठेवत पुणे व कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पुणे व कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूक प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, भाजपा फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक सचिन अहिवळे, युवा उद्योजक मनोज कांबळे, प्रशांत कोरेगावकर, बाबुमामा शिंदे, सुनील जाधव यांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!