
स्थैर्य, फलटण, दि. 1 : फलटण शहरातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिनांक 2 मे ते 8 मे 2021 या कालावधीसाठी फलटण शहर प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेनमेंट झोन) घोषित केले असून या दरम्यान नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुलभरित्या होण्यासाठी पालिकेकडून भाग निहाय संपर्क अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी आपल्या भागत नेमून दिलेल्या संपर्क अधिकार्यांशी संपर्क साधावा. हे अधिकारी आपल्याला विक्रेत्यांमार्फत वस्तू पोचविणेकामी मदत करतील. तरी शहरवासियांनी या कठीण काळात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले आहे.
या सर्व यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर नियंत्रण अधिकारी म्हणून प्रमोद माने (मो.7588795584), अनिल भापकर (9552673822), योगेश पवार (7757812914) यांची नियुक्ती करण्यात आली असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणेसाठी शहरातील नेमून दिलेले भाग निहाय अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. –
शिरीष पवार, संपर्क अधिकारी (मो.9421567708), सुरज शिरतोडे, सहाय्यक (मो.8830278764) – कसबा पेठ, संपूर्ण ब्राह्मण गल्ली, भैरोबा गल्ली, दत्तमंदिर परिसर, जुनी महतपुरा पेठ, स्वामी समर्थ मंदिर पर्यंत, बुरुडगल्ली, झारीगल्ली, जाधवआळी, ढोर गल्ली.
श्रीकांत जाधव, संपर्क अधिकारी (मो.9890740003), अनंत अहिवळे, सहाय्यक (मो.8421327822) – रविवार पेठ, पेटकर कॉलनी, कदम वाडा, नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर, अतिथी हॉटेल परिसर, नाना पाटील चौक, भगवान सॉ मील परिसर, रानडे पेट्रोल पंप परिसर, शांतीकाका सराफ परिसर, भोजराज हॉटेल परिसर, नागेश्वर मंदिर परिसर, सोमवार पेठेतील खाजगी मिळकतदार, परिवार साडी सेंटर परिसर भाग.
विशाल सोनवले, संपर्क अधिकारी (मो.9420726252), आशिष काकडे, सहाय्यक (मो.7020773156) – रविवार पेठ, मॅग फायनान्स, सुनिल मेडिकल, शांतीकाका सराफ नविन दुकान परिसर, लक्ष्मीनगर, पिरसाहेब मंदिर, नामजोशी पेट्रोल पंप, बारव बाग, मोनिता गार्डन, गोळीबार मैदान, विद्यानगर संपूर्ण भाग.
नितीन वाळा, संपर्क अधिकारी (मो.9730477272, राकेश गलीलय, सहाय्यक (मो.8862075117) – संपूर्ण शुक्रवार पेठ, बारस्कर गल्ली, मारवाड पेठ, तेली गल्ली, बुधवार पेठ.
प्रदिप काकडे, संपर्क अधिकारी (मो.8484097485), सचिन वाळा, सहाय्यक (मो.8055697272) – इंदिरा गांधी झोपडपट्टी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, शिवाजीनगर झोपडपट्टी, दत्तनगर झोपडपट्टी, शनीनगर, मंगळवार झोपडपट्टी, सोमवार पेठ झोपडपट्टी, पुजारी कॉलनी झोपडपट्टी, घडसोली मैदान झोपडपट्टी.
अमोल सरतापे, संपर्क अधिकारी (मो.9552262232), दत्तात्रय गुंजवटे, सहाय्यक (मो.9922192088) – स्वामी समर्थ मंदिर परिसर ते काळूबाईनगर, संतोषी माता रोड, सुरेश पवार घर लाईन, दत्तमंदिर रोड, सगुणामातानगर, पतंगे रोड, साई मंदिर परिसर, गोसावी वस्ती, पुना रोड, पाण्याची टाकी परिसर.
मुकेश अहिवळे, संपर्क अधिकारी (मो.8483095494), अमोल मोहोळकर, सहाय्यक (मो.9028287558) – कुंभार टेक, खाटीक गल्ली, बुरुड गल्ली, रविवार पेठ सिमेंट रोड पलिकडील भाग, कुरेशीनगर, मंगळवार पेठ, खाजगी मिळकती, पाचबत्ती चौक.
शरद अहिवळे, संपर्क अधिकारी (मो.8329449013), दिलीप अहिवळे, सहाय्यक (मो.9766590556) – मेटकरी गल्ली, रामोशीगल्ली, पवारगल्ली, नारळीबाग, डेक्कन चौक, अपना बझार परिसर, माळजाई पाठीमागील सर्व भाग, सागर अपार्टमेंट, ललित मोहन परिसर, शारदा अपार्टमेंट, सरस्वती अपार्टमेंट, रामकुंड अपार्टमेंट परिसर, जुनी स्टेट बँक कॉलनी, माई बझार ते सुर्यवंशी बेडके घर परिसर.
सुरेश जाधव, संपर्क अधिकारी (मो.9960735723), विकास हाके, सहाय्यक (मो.9423828707) – बुधवार पेठ धनगरवाडा, कामगार कॉलनी, स्वामी विवेकानंदनगर, भडकमकरनगर, पद्मावतीनगर, आनंदनगर, संजीवराजेनगर, हाडको, हनुमाननगर, संत बापूदासनगर.
भारत काकडे, संपर्क अधिकारी (मो.9284008844), प्रमोद अहिवळे, सहाय्यक (मो.9623751111) – गोसावी गल्ली झोपडपट्टी, इंदिरानगर झोपडपट्टी, गणेशनगर झोपडपट्टी, कुंभार भट्टी दहावी शेड.
विलास टेंबरे, संपर्क अधिकारी (मो.9359671004), हजरल कोतवार, सहाय्यक (मो.8087376985) – पुजारी कॉलनी, संपूर्ण शिवाजीनगर, डॉ.फडे हॉस्पिटल परिसर, डॉ.निकम पाटील हॉस्पिटल परिसर, महाराजा मंगल कार्यालय संपूर्ण परिसर, रिंगरोड पलीकडील संपूर्ण भाग, मोनिता विश्व अपार्टंमेंट, श्रीराम अपार्टमेंट, रामालय अपार्टमेंट मागील सर्व परिसर.
हे सर्व अधिकारी त्यांना नेमून दिलेल्या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार किराणामाल, भाजीपाला, दूध, औषधे इत्यादी जीवनावश्यक वस्तू संबंधित विक्रेत्यांशी संपर्क साधून त्यांचेमार्फत संबंधित नागरिकांना घरपोच पुरवठा करतील, असेही प्रसाद काटकर यांनी सांगितले आहे.